Puneri Patya for IPL Lovers - 5

6. क्रिकेट हा एक खेळ आहे ह्याचे भान ठेवावे, आम्ही मॅचफिक्सींग करत नसल्याने जिंकण्याची कसलीचगॅरेंटी देता येणार नाही.

7. देणग्या मागणारे, गौरवनिधी सामने आयोजीत करणारे, सर्व्हे करणारे, फुकटात जाहीरातीसाठीकार्यक्रमाला हजरी लावण्याची विनंती करण्याची शिष्ठमंडळे आदी तत्सम व्यक्ती किंवा संस्था ह्यांना सक्तप्रवेश बंदी आहे, ह्यात कोणत्याही कारणास्तव बदल होणार नाही.

8. आमचे प्रतिस्पर्धी संघ कमी किमतीत खेळत असल्याच्या बढाया आमच्यासमोर मानु नये. आमचे इथेक्वालिटीला प्राधान्य असल्याने कमी किमतीत सामना खेळवण्याचा विचार केला जाणार नाही.

9. आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी असताल तर इतरांना सांगा, नसताल तर योग्य आणि सभ्यशब्दात आम्हाला सांगा, योग्य दखल घेतली जाईल.

10. आमचेकडे शाळकरी संघांना ट्रेनिंग दिले जात नाही

11. आमच्याशी ठरलेल्या करारानुसार सामना झाल्यावर आमच्याकडुन सदिच्छा म्हणुन खेळाडुंचे टी-शर्ट्स,ट्रॅक सुट्स, टोप्या, बॅटी, चेंडु अथवा तत्सम कुठलेही किमती सामान भेट मिळणार नाही. उगाच हावरटपणाकरु नये.