World Cup Fever: Puneri Office Memo

प्रिय मालक,

हे विश्वाचाशाक्चे दिवस आहेत हे तुम्हाला माहिती आहेच

विश्वचषकाच्या काळातही मी संगणकाला नाक चिकटवून काम कराव , उत्तम कामगिरी करावी आणि आफिसाला वेळेवर यावा अस तुम्हाला वाटत असेल .......असेलच !
त्या वाटण्याला माझी काहीच ना नाही , पण मी येत्या महिनाभर काम कराव्व अस वाटत असेल तर कृपया काही गोष्टी लक्ष्यात ठेवाव्यात हि विनंती ......!

१. सामना सुरु असताना उगीच खत्रूड लुक देऊ नये तुम्ही तसा लुक दिला आणि तिकडे सचिन बाद झाला तर मी राजीनामा देण्याचा टोक गाठ्ण्याचीही शक्यता आहे .

२. सामना सुरु होण्यापूर्वी आणि संपल्यानंतरच काय ती कामं सांगावी प्लानिंग च्या मिटींगा कराव्या ,त्या मिटिंग लवकर संपवाव्या अगदी नाईलाज म्हणून मी सामना सुरु असतानाही मिटींगला येईल पण तेव्हाही स्कोर काय झाला आहे हे मोबैलेवर पाहीन. किंवा सहकार्यांना विचारेन .त्या स्कोर्प्रमाणे माझे मूड्स बदलतील तेव्हा प्लीज .............

३. मूड्स वरून आठवल येत्या महिनाभराच्या काळात मी नार्मल नसेन ,तेव्हा माझ्याशी बोलताना जरा जपून... इंडिया जिंकत असेल तर मी अति उत्तेजित असेन आणि त्या उत्तेजीते पोटी कामच करणार नाही . इंडिया दुर्देवान्न हरली एखादा सामना तर माझं डोकं तापेल

४. सामना हि गप्प बसून पाहण्याची गोष्ठ नसते मी क्रिकेटचा जाणकार आहे . मी आपल्या आफिसातल्या हर्ष भोगले आहे अस्स समजा हव्व तर , माझ्यासारखे असे अनेक हर्ष , श्रीकांत आणि मंदिरा बेडीही आपल्या आफिसात आहेत. आम्ही चर्चा करणार एक्स्पर्त कमेंट देणार ,वाद होणार ..............

५. विश्व चषक पुढच्या वर्षी कदाचित सचिन खेळणार नाही , तेव्हा प्लीज ...............नुस्त डोक्क ताप वू नका ...............

तुमचा कर्मचारी