Mumbai Bomb Blast 13th July 2011 - पुन्हा तीच हरामखोरी

Sorry to post this on 'Jokes' blog but....

पुन्हा तीच हरामखोरी
पुन्हा तीच लाचारी ,
नव्याने जुनीच बिमारी
पुन्हा फुत्त्कार जहरी,

दरवेळी नवीन नराधम उठतो
आंधळ्या सुडाने पेटतो ,
लोकशाहीच्या पळवाटा असल्याने
आयुष्य आरामात काटतो .

सरकार नेहमीप्रमाणे लाचार
मृत्यूचे तांडव करतात सहन,
रोजच जनता मारताना चालतात
चर्चा, आयोग, चौकश्या गहन .

कधी नक्षलवादी कारवाया
कधी आतंकवादी हल्ले ,
देशोधडीला राष्ट्र लागताना
नेते भरतात स्वतःचेच गल्ले.

सापडेल त्याला एकच शिक्षा
बाकीचे नाटक बंद करा,
देशातील घातपात संपवण्यास
एकच मार्ग "फासी"चा धरा ---

अजुन पोसा या पाकिस्तानी ला.. आज त्याचा वाढदिवस आहे.. कित्येक वर्ष पोस्तोय त्याला इतक्या काळजिने त्याबद्दल धन्यवाद दिलाय या आपल्या शेजारी राष्ट्राने.. बॉम्बस्फोट करायचे देशाचा विकास गतीवर परिणाम करायचा हे या पाकी अतिरेक्यांच नेहमीच झालाय आता. आणि आपण फक्त सहन करायचे आणि राजकारण्यांनी याचे राजकारण करायचे आणि म पुन्हा एका "कसाब" ला सरकारी पाहुना बनवून पाहुनचार करायचे. एकाच प्रश्न मला नेहमी पडतो कुठलाच मंत्री, मोठा माणूस अश्या अपघातात मरत कसा नाही?? मारतो तो फक्त सामान्य माणूसच का?? याच उत्तर आहे का सरकार कडे?? मला फक्त इतकाच बोलायचं की या बॉम्बफोतात जखमी झालेल्यांना लौकर मदत मिळावी आणि मृत्यू झालेल्यांच्या परिवराला ही परिस्थिती हाताळण्याची शक्ति द्यावी इतकीच परमेश्वराला प्रार्थना...

Thanks to this patriot who wrote this poem (don't know who)