Rajnikant Mahatmya - 1

  • एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात. 

  • रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला.

  • एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं म्हणे!

  • रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला, दुपारी त्याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली.. बिना पासपोर्ट-व्हिसा अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल.

  • एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं, ‘‘उगाच थरथर कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात. रजनीकांत वजनीकांत जगात काहीही नसतं!’’

  • एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला.. शेवटी सूर्याचीच पापणी लवली.

  • ‘रोबो’ सिनेमा हिट झाला, तेव्हा रजनीकांतने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला चार स्टारचे रेटिंग दिले.

  • देवाला जेव्हा जेव्हा मानसिक धक्का बसतो, तेव्हा तो ‘अरे रजनीकांता’ असे उद्गारतो.