Rajnikant Mahatmya - 2

- न्यायदेवतेने एकदा रजनीकांतकडे क्रुद्ध नजरेने रोखून पाहिले होते.. ती आजतागायत आंधळी आहे.
- रजनीकांत खिडकी उघडी ठेवून एसी चालू करतो, तेव्हा देशात हिवाळा सुरू होतो.
- रजनीकांतशी गप्पा मारताना.. राज ठाकरेही तामिळ बोलतात.
- पॉवर ऑफ रजनीकांत! तुम्ही रजनीकांतचा जोक एका माणसाला फॉरवर्ड करता..तो एका तासात एक कोटी माणसांपर्यंत पोहोचतो.
- इजिप्तमधील पिरॅमिड हे खरेतर रजनीकांतचे चौथीतले भूगोलाचे प्रोजेक्ट्स आहेत.
- कार्यकारी अभियंता, कोयना धरण विभाग: "रजनीकांतचा फोन व्हायब्रेटर मोडवर असला, तरी कोयना धरणाला धोका नाही"

- मुंबईतली वीज कधी कधी अचानक थोडय़ा वेळासाठी गायब होते..कारण, तेव्हा रजनीकांतने आपला फोन चार्जिगला लावलेला असतो.

- रजनीकांतने एक दिवस शाळेला बुट्टी मारली.. शाळेने तो दिवस रविवार असल्याचे जाहीर करून टाकले.

- रजनीकांतला एकदा एका रिपोर्टरने विचारले, ‘‘मोबाइल आणि इंटरनेटवर फिरणाऱ्या रजनीकांत जोक्सविषयी तुझं मत काय?’’ रजनीकांतने गंभीरपणे प्रतिप्रश्न केला, ‘‘तुला खरंच वाटतं की ते काल्पनिक विनोद आहेत म्हणून?’’

- संता-बंता आत्महत्या करणार आहेत. रजनीकांतमुळे आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

- रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता. रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो डाव हरला.. का?
कारण त्या मुलाकडे तीन रजनीकांत होते.