More Rajnikanth Jokes




- रजनीकांतच्या घरी मादाम तुसॉचा मेणाचा पुतळा आहे.

- प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते, ते परतच केले नाहीत.. तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.

- एकदा एका ट्रेनची सायकलशी टक्कर झाली आणि ट्रेन रुळावरून घसरली.. सायकलचालक रजनीकांत फरारी झाला आहे.

- रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले..भारतात बसून, ब्लूटुथवरून.

- ‘‘बेटा रजनीकांत आपल्या सोलर वॉटर हीटरमधून गार पाणी येतंय रे,’’ आईने ओरडून सांगितले.
रजनीकांत तडक छतावर गेला आणि सूर्य दुरुस्त करून आला.

- रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ‘‘मला सतत अशी भावना होते की कुणीतरी माझा पाठलाग करतंय.’’
- दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ‘‘माय गॉड, माझी सावली कुठे गेली?’’

- प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’
मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता उत्तम वकील म्हणून नाव कमावायचंय. भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करून नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.’’
प्रोफेसर म्हणाले, ‘बाप रे, तुझं नाव काय?’’
‘‘सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.’’